स्वावलंबी शिक्षण या माझ्या शैक्षणिक ब्लॉग वरती तुमचे स्वागत आहे.

10 वी अभ्यासमाला

शाळा ऑनलाईन

HOME

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य

 

          कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९०९ मध्ये सांगली जिल्ह्यातील दूधगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२१ मध्ये नेर्ले ता. वाळवा या ठिकाणी वसतिगृह स्थापन करण्यात आले. पुढे १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालयाचे सातारा या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले व सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे मिश्र वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. आणि याच वसतिगृहाचे २५ फेब्रुवारी १९२७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते थोर समाज सुधारक ‘राजर्षी शाहू महाराज वसतिगृह’ असे नामकरण करण्यात आले. १९३२ साली उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी युनियन बोर्डिंग हाऊस ची स्थापना पुणे या ठिकाणी केली. ६ मे १९३५ साली रयत शिक्षण संस्थेचे ‘द सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६०’  नुसार रजिस्ट्रेशन करण्यात केले. १९३६ साली सातारा येथे मा. रा.ब. काळे यांच्या नावाने पहिली मराठी शाळा सुरू केली. तसेच १९३८ मध्ये यवतेश्वर येथे रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवली जाणारी पहिली व्हालंटरी  प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. पुढे अशाच ५७८ प्राथमिक शाळा डोंगराळ व दुष्काळी भागातील खेडेगावांमध्ये सुरू केल्या.
                   १९४२ साली मुलींच्या शिक्षणासाठी मिश्र वसतिगृह स्थापन केले. आणि प्राथमिक श्री शिक्षिकांसाठी ‘जिजामाता अध्यापिका विद्यालय’ या नावाने ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. १९४७ साली ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नावाने उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सातारा येथे सुरू केले. ‘संत गाडगे महाराज महाविद्यालय’ हे कराड तालुक्यात १९५४ साली सुरू केले. तसेच १९५५ साली ‘मौलाना आझाद कॉलेज ऑफ एजुकेशन’ हे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सातारा येथे सुरू केले.

 कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शिक्षण संस्थांना प्रेरक व मार्गदर्शक ठरले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ रोजी ‘पद्मभूषण’ हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला. तसेच कर्मवीर पुणे येथील ससून रुग्णालयात अॅडमिट असताना ५ एप्रिल १९५९ पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला. जगणे- मरणे हा सृष्टीचा अटळ नियम आहे पण मृत्यूनंतरही लाखो जनमानसांच्या मनांमध्ये जीवंत राहणे म्हणजे खर्‍या अर्थाने जीवन सार्थकी लावणे असते.

शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध, शिक्षण म्हणजे आयुष्याचं सोने करणारा परीस असे हे शिक्षण तळागाळातील उपेक्षित जनमानसापर्यंत पोहचवणार्‍या या महान शिक्षण महर्षींचे निधन ९ मे १९५९ रोजी ससून हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी झाला आणि १० मे १९५९ रोजी ‘चार भिंती’ (गांधी टेकडी) सातारा येथे अग्निसंस्कार करण्यात आले.  असे असले तरीही कर्मवीरांचे विचार आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श यांच्यानुसार रयत शिक्षण संस्थेची वाटचाल सुरूच आहे. ऑफ एजुकेशन’ हे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सातारा येथे सुरू केले.

No comments:

Post a Comment